अहमदनगर। नगर सहयाद्री:-
महापालिका कामगारांना दिवाळी सणासाठी ११ हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व पात्र कामगारांना दिवाळीपूर्वी एकरकमी अनुदान वर्ग करण्याचा, तसेच १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या सुमारे ३०० कामगारांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा प्रस्ताव प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी मंजूर केला आहे. कामगार युनियन व प्रशासनाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
कामगार यूनियनने महापालिकेला संपाची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यात ११ हजारांचे दिवाळी सानुग्रह अनुदान, कालबध्द पदोन्नतीचा फरक ९३ लाख रुपये ३१ जुलैपूर्वी अदा करणार, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही जेष्ठता न लावता तात्काळ प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जातील.
सफाई कामगारांना कचरा वाहण्यासाठी ढकल गाडी उपलब्ध करून देण्यात येईल, निवड समिती घेऊन पात्र कर्मचार्यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील, लाड व पागे समिती शिफाराशीनुसार ३०५ व ५०६ सह पात्र कामगारांच्या वारसाना नोकरी देण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस कामगार यूनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय झालेले आहेत.
1. सर्व पात्र कामगारांना दिवाळी सणापूर्वी रु. ११,०००/- एक रकमी सानुगृह अनुदान अदा केले जाईल.
2. कालबध्द पदोन्नतीचा फरक रु.९३ लाख दिनांक ३१ जुलै २०१४ चे आत अदा केले जातील.
3. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही जेष्ठता न लावता तात्काळ संबधित कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जातील.
4. सफाई कामगारांना कचरा वाहन्यासाठी ढकल गाडी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
5. लवकरच निवड समिती घेण्यात येवून पात्र कर्मचारी यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील.
6. एल.एस. जी.डी./ एल.जी.एस उर्त्तीण झालेल्या कर्मचारी यांना जादा वेतनवाढी देणे संदर्भात मा. शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
7. लाड व पागे समिती शिफाराशीनुसार तसेच अनुकंपा तत्वानुसार ३०५, ५०६ व ७६वारस सह पात्र कामगारांच्या वारसाना नोकरी लवकरच देण्यात येईल तसेच ज्यांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांच्याकडून कागदपत्रे यांची पूर्तता करून घेवून त्यांना देखील लवकरच महापालिका सेवेत नोकरी देण्यात येईल.
तसेच मागील निवड समितीमध्ये मंजूर झालेल्या १२/२४कालबध्द पदोन्नतीचे प्रकरणवार आज मा. आयुक्त यांनी स्वाक्षरी केलेली असून लवकरच कालबद्ध पदोन्नती मिळालेल्या सुमारे ३००कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी मनपा प्रशासनाने कामगारांच्या विविध मागण्या मान्य केल्याबद्दल युनियनच्या वतीने सचिव कॉ आनंदराव वायकर यांनी आभार मानले.