spot_img
आर्थिकखुशखबर! लाडकी बहीण योजनेची वेबसाइट लॉन्च; ५ मिनिटात 'असा' भरा अर्ज

खुशखबर! लाडकी बहीण योजनेची वेबसाइट लॉन्च; ५ मिनिटात ‘असा’ भरा अर्ज

spot_img

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ऑनलाइन संकेतस्थळ सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येईल. योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरताना अनेकदा तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. यामुळे महिलांना योजनेसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नारी शक्तीदूत अॅप सुरू केले आहे. मात्र, या अॅपवर अनेकदा सर्व्हर डाऊन, जास्त लोकांना एकाचवेळी अर्ज भरल्यामुळे संकेतस्थळ बंद होण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचसाठी आता नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.

कसे करावे अर्ज

वेबसाइट
https://ladakibahin.maharashtra.gov.in/

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि मॅरेज

ऑनलाइन अर्ज करण्याची स्टेप्स
1. वेबसाइटवर लॉग इन करा.
2. गाव, वॉर्ड, तालुका निवडा.
3. आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
4. अर्ज सबमिट करा.

लाडकी बहिणसाठी ७ लाख ऑनलाईन अर्ज
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावाणी करण्यात येत असुन आतापर्यंत ७ लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यात आले आहे. या आनलाईन अर्जाची युध्दपातळीवर छानणी प्रशासनाकडून सुरू आहे. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष मोहिम राबविण्यात आली. तसेच या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी केलेल्या सुनियोजन कामामुळे ७ लाख महिलांचे अर्ज भरुन घेण्यात यश प्राप्त झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...