spot_img
अहमदनगरसरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
सध्या राज्यात घोषणांचा पाऊस पडत आहे. योजनांसाठी पैसे नाहीत. सरकारवर ८ लाख कोटी कर्ज आहे. सरकार बँकांकडे कर्ज मागत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सरकार विविध घोषणा करत आहे. योजनांच्या घोषणा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाल्या नाहीत. त्या नंतर होत आहेत. जे लाडक नव्हत ते लाडकं वाटायला लागलय. सरकारच्या घोषणा या फक्त खुर्चीसाठीच असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, महायुती सरकारच्या योजनेपेक्षा महाविकास आघाडी सरकार चांगल्या योजना आणेला असे सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने महाराष्ट्रात जनजागृती करण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. नगरमध्ये शिव स्वराज्य यात्रेची टिळक रोडवरील नंदनवन लॉन येथे सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार नीलेश लंके, खा. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष राजेंळ फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष तथा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, पक्ष निरीक्षक अंकूश काकडे, मेहबूब शेख, नितेश कराळे, डॉ. अनिल आठरे, अशोक बाबर, नामदेव पवार, योगिता राजळे, पंडित कांबळे, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, रामेश्वर निमसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार घाबरले आहे. त्यामुळे सध्या फक्त घोषणांचा पाऊस पडत आहे. तसेच नोव्हेंबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या पावसाला बळी पडू नका. सध्या राज्यात लाडक्या बहिणी, मुली सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सरकार चालवणार्‍यांचा वचन प्रशासनावर राहिलेला नाही. त्यामुळे पुढील सरकार महाविकास आघाडीचेच येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कायद्यात दुरुस्त्या करु, पोलिसांच्या कामात सुधारणा करुन महिलांना सुरक्षिता वाटेल असे काम करु असे पाटील यांनी सांगितले. नगर शहर बदलायच असेल, शहराचा विकास करायचा असेल तर एकदिलाने काम करुन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे ते म्हणाले. यावेळी खा. नीलेश लंके, अमोल कोल्हे, नितेश कराळे यांची भाषणे झाली.

अभिषेक कळमकर यांचे जयंत पाटलांकडून कौतुक
शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी महापौर पदाच्या काळात चांगली कामे केली. भव्य रॅली काढली, चोख नियोजन केले असल्याचे सांगत कळमकर यांच्या पाठिवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुकाची थाप टाकली.

नगरच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम
आगामी विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. नगरच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसनेही दावा सांगितला आहे. त्यातच माजी महापौर संदीप कोतकर हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातेय. विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा राज्यभर काढली जात आहे. नगरमध्ये जयंत पाटील यांनी यात्रेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नगरच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला. जागा वाटप जाहीर झाल्यानंतर उमेदवारीची घोषणा केली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच एकसंघ राहिल्यास नगरची जागा महाविकास आघाडीच जिंकेल असा विश्वासही व्यक्त केला.

विखेंना पाडून लंके निवडून येऊ शकतात तर आपलं काय…
नगरमध्ये दादागिरी, गुंडगिरी, ताबागिरी वाढलीय. त्यामुळे जनता त्रस्त. काहीही करा यांना घालवा असे नागरिक म्हणत आहेत. बलाढ्य विखेंना पाडून लंके निवडून येऊ शकतात. तर आपल काय अशी भिती नगरमधील लोकप्रतिनिधींना वाटायला लागलीय. त्यामुळेच जुना विश्वास आता जागा झालाय. जुन्या विश्वासाचा किती वेळा धावा करायचा. नवा विश्वास आहे की नाही. नवा विश्वास समोर आणण्याचे काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

शहरातील दादागिरी, गुंडगिरीने जनता त्रस्त: अभिषेक कळमकर
नगर शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना निवडून दिले. परंतु, विकासासाठी भरीव निधी आणता आला नाही. लंके यांनी ७०० कोटींचा निधी आणला. आता निवडणुकीच्या तोंडावर जाहिरात बाजी सुरु केलीय. प्रॉडॉक्ट खराब असेल तरच त्या मालाची मार्केटिंग करावी लागते त्याच प्रमाणे नगरमध्ये सध्या सुरु असल्याचे सांगत गुंडगिरी करणार्‍यांना जनता धडा शिकवेल असे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले. पक्ष फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलं नाही. राज्यात काही आमदारांनी गद्दारी केली तशी गद्दारी शरद पवार यांच्यासोबतही झाल्याचे कळमकर म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार! पत्रकार परिषदेत कोणी दिला इशारा?, कारण काय? वाचा..

अहमदनगर । नगर सह्याद्री:- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी...