संगमनेर । नगर सहयाद्री
तालुक्यातील देवगाव येथे नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून नातवाने आजीचे प्राण वाचवले. या घटनेत आजी गंभीर जखमी झाल्या आहे. भीमबाई लक्ष्मण लामखेडे असे जखमी झालेल्या अजीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास देवगाव येथील लामखडे वस्ती येथील योगीरा फार्म जवळ राहुल बाळासाहेब लामखेडे यांच्या उसाच्या शेताजवळ नर भक्षक बिबट्याने एका आजीवर हल्ला चढवला.
आजीने आरडाओरडा करताच शेजारीच असलेलया नातू प्रसाद लामखडे यांने आजीकडे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून आजीची सुटका केली. या हल्ल्यात आजी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुगणालयात उपचार सुरु आहे.
नुकताच हिवरगाव पावसा येथील मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता .त्यामध्ये त्या मुलीला आपला जीव गमाव लागला होता. हाच तो बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याची परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या नरभक्षक बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.