spot_img
अहमदनगरतोफखाना पोलीसांची मोठी कारवाई? नाशिकचा परवेझ नगरमध्ये करायचा असं काही..

तोफखाना पोलीसांची मोठी कारवाई? नाशिकचा परवेझ नगरमध्ये करायचा असं काही..

spot_img

अहमदनगर। सहयाद्री:-
तोफखाना पोलिसांनी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे. परवेझ जावेद मणियार ( रा. नाशिक ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यात सोने चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. पहिल्या प्रकरणात, सुजाता राहुल अष्टेकर रा. पाईपलाई रोड या त्यांचे घराकडून पाईपलाईन रोडकडे पायी जात असताना त्यांचे गळयाती पावनेदोन तोळे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून नेल्याची फिर्यादी दाखल करण्यात आली होती. तर दुसऱ्या प्रकरणात अंजली अनिल धोपडकर( रा. भुतकरवाडी अहमदनगर ) यांच्या गळयातील दिड तोळे वजानची सौन्याची चैन बळजबरीने हिसकावुन नेल्याची फिर्यादी दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर प्रकरणाचा तपास केला आणि आरोपी परवेझ जावेद मणियार याला अटक केली. तपासात, आरोपीने चोरलेले सोने नाशिक येथील एका सोनारास विकल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सोनाराकडून एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत केले आहे.

सदरची कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली मा.पो.नि आंनद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी. पाटील, सफौ तनवीर शेख, पोहेकों दत्तात्रय जपे, सुनिल शिरसा अहमद इनामदार, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुरज बबाळे, पो.ना संदिप धामणे, पो ना वसीम पठाण, पो सुमीत गवळी, सतीष त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीष भवर, बाळासाहेब भापसे राहुल म्हस्के, चेतन मोहिते यांच्या पथकांने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...