अहमदनगर | नगर सह्याद्री-
अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी २५ ते ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दौंड (जि. पुणे) तालुयातील एका गावात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने सोमवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दौंड तालुयातील एका गावातील चौघांचा, करमाळा (जि. सोलापूर) तालुयातील पाच जणांचा व इतर अंदाजे १५ ते २० अनोळखींचा समावेश आहे. ही घटना १९ ऑगस्ट २०२० ते ९ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली आहे.
संशयित आरोपी यांनी फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिचा विवाह करून दिला. फिर्यादी मुलीच्या पतीने फिर्यादी अल्पवयीन असूनही तिच्या सोबत शारिरीक संबंध ठेवले. तसेच चौघांनी मुलीचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.