नगर सह्याद्री टीम :
Health Tips : पेरू हे फळ माहिती नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. पेरू हे अनेकांचे आवडते फळ देखील आहे. या फळामध्ये अनेक जीवनसत्वे असतात. याचाच शरीराला चांगला फायदा होतो. व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट, अँटीडायबेटिक, डायरियाल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल आदी गुणधर्म पेरूमध्ये आढळतात. परंतु काही लोकासांठी हे फळ मात्र चांगले नाही. हे फळ खाणे कुणी टाळावे याबाबत माहिती जाणून घेऊव्यात –
शस्त्रक्रिया
जर तुमचे कोणतेही ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया होणार असेल तर तुम्ही 2 आठवडे अगोदर पेरू खाणे थांबवले पाहिजे. या फळाच्या सेवनाने रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात.
स्तनपान करणाऱ्या माता
गरोदर असणाऱ्या महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी पेरूपासून दूर राहणे गरजेचे आहे. कारण यामुळे त्यांच्या बेबीस हानी होऊ शकते.
सर्दी
सर्दीमधे पेरूचे सेवन करू नये. पेरूचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे सर्दी खोकला असेल तर पेरूचे सेवन करू नये.
एक्जिमा
एक्जिमाचा त्रास असलेल्यांनी पेरू खाऊ नयेत, कारण याच्या सेवनाने त्वचेवर खाज येऊ शकते.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
ज्या लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनलचा त्रास आहे त्यांनी अजिबात पेरू खाऊ नयेत. या समस्या असणाऱ्यांनी पेरू खाल्ल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.