नगर सह्याद्री टीम : टोमॅटो हे फळ सर्वच ठिकाणी उपलब्ध होणारे फळ आहे. स्वयंपाक घरात बाराही महिने उपलब्ध असणारे हे फळ प्रत्येकाच्या आहारामध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे. पदार्थाला चांगली चव येण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो. परंतु आज आम्ही तुम्हाला टोमॅटोपासून होणारे फायदेही सांगणार आहोत.
१) वजन नियंत्रण: टोमॅटो रोज खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तसेच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
२) सशक्त हाडे: हाडांच्या बळकटीसाठी टोमॅटो फार उपयोगी पडतात.
३) दृष्टी सुधारते : ज्यांना कमी दिसते अशा लोकांची टोमॅटोमुळे डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी फायदा होतो.
४) शरीरात ऊर्जा येते: टोमॅटोचा ज्यूस पिल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
५) बीपी कंट्रोल: टोमॅटोचं सेवन हाय बीपीने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे.
६) हृदयरोगांमध्येही टोमॅटो ज्यूसचं सेवन करणे फार गुणकारी असते.
७) रातांधळेपणा: अनेकांना रातांधळेपणा त्रास होतो. टोमॅटोमुळे हा आजार दूर होण्यास मदत होते.
८) टोमॅटोमध्ये पाणी आणि फायबरची मात्रा जास्त असते. त्यामुळे पोट लवकर भरते आणि फॅट्सही वाढत नाहीत.