spot_img
देशनागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम –
हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण करत असतात. नको ते धाडस जीवावर बेतू शकते, हे माहीत असतानाही अनेकजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी नको ते व्हिडीओ बनविण्याचे धाडस करतात. अशा घटना दिवसेंदिवस समोर येतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात. तरीही रोज कुणी ना कुणी जीवाशी खेळ करणारे व्हिडीओ करतात. तेलंगणात एका २० वर्षीय युवकाने थेट कोब्रा जातीच्या नागाला तोंडात धरून व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ तर बनला, पण सदर युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

नेमके प्रकरण काय?
तेलंगणात घडलेल्या या घटनेतील मृत तरुणाचे नाव शिवराज असल्याचे सांगितले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिवराज आपल्या तोडांत कोब्रा जातीचा नाग धरून रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे. नागाचे डोक शिवराजने त्याच्या तोडांत धरलं आहे. शिवराज कॅमेऱ्यात पाहून हात जोडताना दिसतो, तसेच मधे मधे तो आपल्या केसांवरूनही हात फिरवतो. दरम्यान नाग आपली सोडवणूक करण्यासाठी शेपटी हलविताना दिसून येत आहे. व्हिडीओ संपवताना शिवराज चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला अंगठा दाखवतो आणि तिथे व्हिडीओ संपतो.

तेलगू स्क्राइब या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज आणि त्याचे वडील सापांना मारून आपली उपजीविका चालवितात. हा नाग या बाप-लेकांनीच पकडला होता. तसेच वडिलांच्या सांगण्यावरून शिवराजने नागाला तोंडात धरून रील बनवायला घेतलं. मात्र व्हिडीओ संपवून नागाला तोंडातून बाहेर काढताना नागाने शिवराजला दंश केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

सोशल मीडियावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एक्स आणि फेसबुकवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नागाला तोंडात धरण्याचे नाहक धाडस करण्याची काय गरज होती? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. ‘हे किती भीतीदायक आहे आणि असले नको ते उद्योग करावेच कशाला?’, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. “फक्त रीलसाठी अशी जोखीम पत्करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...