spot_img
राजकारणमोदी सरकार आल्यापासून दहशतवाद किती घटला? पहा..

मोदी सरकार आल्यापासून दहशतवाद किती घटला? पहा..

spot_img

नगर सहयाद्री / दिल्ली
मागील काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी झालं आहे. हा दहशतवाद किती कमी झाला याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी आकडेवारी संसदेत सादर केली. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत जवळपास ७० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा अमित शाह यांनी केलाय.

जम्मू काश्मीरशी संबंधित जम्मू-काश्मीर पुनर्गठन (संशोधन) विधेयक आणि जम्मू-काश्मीर आरक्षण (संशोधन) विधेयक ही दोन विधेयके सोमवारी राज्यसभेमध्ये पारित करण्यात आली. या विधेयकांवरील चर्चेवेळी अमित शाह यांनी सांगितले की, कलम ३७० ने जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घातले गेले होते.यामुळे दहशतवाद निर्माण झाला. परंतु कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो विरोधी पक्षांचा मोठा पराभव असल्याचे अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबाबत काही आकडेवारीही सभागृहासमोर ठेवली. त्यांनी दावा केला की, मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. अमित शाह यांनी सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या. तर मागच्या दहा वर्षांमध्ये २ हजार १९७ दहशतवादी कारवाया झाल्या आहेत.

अमित शाह यांनी पुढे सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये २०१० मध्ये दगडफेकीच्या २ हजार ६५६ घटना घडल्या होत्या. मात्र यावर्षी दगडफेकीची एकही घटना घडली नाही. सन २०१० मध्ये दगडफेकीत ११२ जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी अशा प्रकारे एकही मृत्यू झालेला नाही. तसेच २०१० मध्ये पाकिस्तानकडून ७० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं. मात्र यावर्षी केवळ ६ वेळा शस्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

सभागृहातील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादामुळे आतापर्यंत ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. १९९४ ते २००४ दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ४० हजार १६४ घटना घडल्या होत्या. तर २००४ ते २०१४ या काळात दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या होत्या. तर मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ ते २०२३ पर्यंत दहशतवादाच्या सुमारे २ हजार घटना घडल्या आहेत असे अमित शाह यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...