नगरसह्याद्री टीम : जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरात अनेक समस्या दिसून येतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे हाडांची कमकुवतता. हाडे कमकुवत झाल्याने अनेक समस्या उद्भवतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली खूप महत्वाची आहे. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त आहार हाडे निरोगी ठेवेल. येथे आपण अशा काही चविष्ट आणि पौष्टिक पेयांविषयी माहिती पाहुयात जेणे करून तुमची हाडे प्रचंड मजबूत राहतील.
संत्र्याचा रस
संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर जीवनसत्त्वांसह कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. आपण दररोज संत्र्याचा रस घेऊ शकता.
दूध
हाडे मजबूत करण्यासाठी दुधापेक्षा चांगले पेय असू शकत नाही. दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए आणि डी असते जे हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
स्मूदी
पालकासह हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम आणि लोह आढळते जे हाडांसाठी खूप उपयुक्त आहे. आपण या हिरव्या भाज्यांची स्मूदी बनवून पिऊ शकता. याचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात.
बदाम दूध आणि खजूर
बदामाचे दूध आणि खजूर एकत्र करून ड्रिंक बनवा. याचे दररोज देवन करा. यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते.
अननसाचा ज्यूस
अननसात कॅल्शियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. याने हाडे निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही रोज सकाळी अननसाचा ज्यूस पिऊ शकता. याने तुमची हाडे मजबूत होतील.