अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ऍशनमोडवर आले आहे. पोलिसांनी साकत गाव व या परिसरात अवैध हातभट्टी चालकांवर कारवाई केली आहे. चार ठिकाणे छापे टाकून १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.
अधिक माहिती अशी : साकत गाव व परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार याच्या ताब्यातील ३६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात हरिभाऊ मौला पवार यांच्यावर कारवाई करत ३८ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करत गुन्हा दाखल केला.
तिसरी कारवाई साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात करत सोपान हरिभाऊ पवार याच्यावर कारवाई करत ४२ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करत गुन्हा दाखल करण्यात आला. चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात आकाश महिपती पवार याच्यावर कारवाई करत ४६ हजारणाचा मुद्देमाल नष्ट करत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, धुमाळ,शेख, खरात पालवे, भालसिंग, जायभाय, शिंदे, गोरे, बोराडे, खेडकर, शिरसाट आदींच्या पथकाने कारवाई केली.