spot_img
अहमदनगरसावरगावमध्ये जलजीवनचे काम खोळंबले; ग्रामस्थांनी घेतली आक्रमक भूमिका...

सावरगावमध्ये जलजीवनचे काम खोळंबले; ग्रामस्थांनी घेतली आक्रमक भूमिका…

spot_img

शासकीय जागेतील अतिक्रमण काढा/ ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अतिक्रमण न काढल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा

पारनेर / नगर सह्याद्री :
तालुक्यातील सावरगाव मध्ये शासकीय जागेमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन योजनेचे काम थांबले आहे. यासंदर्भात सावरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. न्याय न मिळाल्यास नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. प्रियाताई निलेश चिकणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे बाळासाहेब शिरतार, लोकशाही मानव हित पक्षाचे रामदास साळवे, युवा नेते निलेश चिकणे, सरपंच शांताराम शिंदे, विष्णु माने, बाळासाहेब शिंदे, शिवराम चिकणे, आदी सावरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की
मौजे सावरगाव ता.पारनेर येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर १२१ व १३२ मधून ५० फुट शासकीय ओढ्याची जागा होती व आहे .सदर ओढ्याच्या जागेत अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या इसम नामे सुभाष मार्तंड चिकणे व इतर हे जबरदस्तीने अतिक्रमण करून शेती करत आहे.त्याजगेत सन 2021 मध्ये सावरगावासाठी जल जीवन पाणीपुरवठा शासकीय योजना मंजूर झालेली आहे ,या योजनेसाठी शासकीय जागेत 50 फूट ओढ्यात सार्वजनिक विहिरीचे खोदकाम अतिक्रमण करणाऱ्या 5 ग्रामस्थांनी थांबवले आहे.सदर पाणीपुरवठा शासकीय योजनेद्वारे सावरगाव येथील सर्व ग्रामस्थांचा कायमचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

परंतु संबंधित अधिकारी मा. तहसीलदार साहेब पारनेर, मा.अभियंता साहेब पारनेर,मा.उप अभियंता पारनेर हे कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही.तसेच आम्हा ग्रामस्थांचे म्हणणे देखील ऐकून घेत नाही .त्यामुळे दिनांक: २५/०५/२०२४ रोजी गट नं :१२१ व १३२ गटाची सरकारी मोजणी करून सदर मोजणीत ५० फुट सर्वजनिक ओढा निघत असल्याने सदर ओढ्यात सुभाष मार्तंड चिकणे यांचे अतिक्रमण असल्याचे मोजणीत आढळून आले आहे.एका व्यक्तीचे अतिक्रमण वाचवण्यासाठी शासकीय कर्मचारी कोणतीही जबाबदारी घेत नाही. उलट अतिक्रमण करणाऱ्यास पाठीशी घालत आहे. तसेंच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीं विरोधात
पारनेर येथील पो.स्टे.मध्ये दिनांक: १६/०८/२०२४ रोजी शासकीय कामात अडथळा आणत असल्याने NCR नोंदविली आहे .पारनेर येथील मे. दिवानी न्यायालयात दावा क्र. ६२१/२०२३ यामध्ये दिनांक: २७/०७/२०२३ रोजी सदर कोर्टाने अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींचे ( stay order) मनाई हुकुम दावा रद्द केलेला असून देखील शासकीय कर्मचारी अद्यापही राजकीय दबावामुळे विहिरीचे काम चालू करत नाही.मा.महोदय आपणास विनंती करतो की, मौजे सावरगाव येथील शासकीय ओढ्यातिल बेकायदेशीर अतिक्रमण काढून जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची विहीरीचि जागा निश्चित करून विहीरीचे काम चालू करावे ही नम्र विनंती.
संबंधित अधिकारी यांस वारंवार लेखी व तोंडी तसेच दूरध्वनी द्वारे संपर्क करूनही शासकीय योजना व लोकांच्या समस्यांना प्राथमिकता देने हे त्यांचे कर्तव्यय असल्याचे विसरले असे वाटते म्हणून आम्हा सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक : १३/०९/२०२४ रोजी सावरगाव नगर कल्याण महामर्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मग होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील याची आपण गंभीर नोंद घ्यावी.
असे सावरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना जलजीवन योजनेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात निवेदन दिले आहे.

सावरगाव हे पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेले गाव अनेक दिवसापासून गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर जलजीवन योजनेच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागेल असे वाटत असतानाच जलजीवन योजनेच्या कामामध्येच स्थानिक ग्रामस्थांनी अडथळा निर्माण केल्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थांना एकत्र करून शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करून त्यांचे अतिक्रमण हे काढण्यात यावे अशी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देत आहोत न्याय न मिळाल्यास आंदोलनाची भूमिका घेणार आहे.

ऍड. प्रियाताई निलेश चिकणे (सावरगाव)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...