मुंबई । नगर सहयाद्री:-
तब्बल आठ वर्षांच्या विश्रातीनंतर पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना भेटीचं निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. आता पाकिस्तानने मोदींना का बोलावलं आहे, मोदी पाकिस्तानला जाणार का? याकडे संपू्र्ण जगांचं लक्ष लागलेलं आहे.
पाकिस्तानचं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटची बैठक आयोजित केली आहे. शाहबाज शरीफ यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या इतर नेत्यांसह पंतप्रधान मोदींना देखील यंदा आमंत्रित केलंन आहे.
कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटची बैठक १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे. तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये सहकार्य करण्यात यश मिळताना दिसतंय .
पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी२०२३ मध्ये भारतात झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी भारताच्या बाजूने आता या बैठकीला कोण उपस्थित राहणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे . सध्या एससीओचं अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे.