Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकदा पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून तसेच शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं म्हणत सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० सप्टेंबरच्या आत करा, अशी मागणी केली आहे. सरकार ३० सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही, बघतोच असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे,
यावरून आता पुन्हा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
सरकार मराठा समाजाच्या मागण्या स्वीकारत नाही, त्यामुळे सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक उमेदवारांचे जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच कर्जमुक्तीच करायची. पिकविमे सगळे द्यायचे, अनुदान सुद्धा सगळं द्यायचं. शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही, आम्ही ३० सप्टेंबरनंतर बघतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.