spot_img
अहमदनगरpolitics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री :-
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. दरम्यान अहमदनगरचा राहुरी विधानसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारणमाजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राहुरी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटीयांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता शिवाजी कर्डिले यांनी आपण राहुरीतुनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले आहे. 2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला होता.

आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...