spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावले!; शांंततेच आवाहन करतोय हे आमचं चुकतय का?

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावले!; शांंततेच आवाहन करतोय हे आमचं चुकतय का?

spot_img

manoj jarange patil : ठाणे | नगर सह्याद्री – मराठा आरक्षणाचा लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ठिकठिकाणी भेटी देत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. मंगळवारी जरांगे पाटील हे ठाणे शहरात आहेत. ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील [manoj jarange patil] पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन मोठे विधान केले असून आमच्या नोदीं मिळत आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मराठ्यांच्या जवळपास ३२ लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत ८५ टक्के लढा झाला. मराठ्यांच्या विजयाचा क्षण बघायचा आहे. मराठ्यांनी पुढील काळात एकजुटीने ठेवा. ताळमेळ हुकला नाही म्हणून इथवर आपण लढा जिंकलो, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे का? जातीय दंगली भडकावून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय. आम्ही कायदा-सुव्यवस्था राखतोय, तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही, मराठी आणि ओबीसीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करतोय, असं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात मनोज जरांगे पाटील यांची ही सभा झाली. त्याआधी जरांगे पाटील यांचे ठाण्यात जोरदार स्वागत झाले. २५ जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. या दौर्‍यावेळी शहरातील चौकाचौकांत, मुख्य नायांवर, रस्त्यांच्या दुतर्फा मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मोठी बॅनरबाजी केल्याचेही पाहायला मिळाले.

सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का?
शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. त्याचबरोबर आम्हीदेखील शांततेसाठीच प्रयत्न करत आहोत, तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. तुम्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांना खतपाणी घालताय का? राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय, जो समाजांमध्ये तेढ निर्माण करतोय त्याला या सरकारचं पाठबळ तर नाही ना? राज्य सरकारला राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का? असे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले.

शांंततेच आवाहन करतोय हे आमचं चुकतय का?
मराठा बांधव एकमेकांना अडी-अडचणीत मदत करतात. रात्री बेरात्री जरी काही अडचण आली तर आपण एकमेकांची मदत करतो. मात्र यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्यात वाद होऊ द्यायचे नाहीत. दंगली होऊ द्यायच्या नाहीत. हे आम्ही रात्रंदिवस सांगतो आहोत. पण ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले. त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. पण जरी तुम्ही गुन्हे दाखल केले. तरी आम्ही थांबणार आहोत का? राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय. तर जरूर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ. लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय. हे आमचं चुकतंय का?, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

लाठीचार्जमधील मधला माणूस शोधा
देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत. तर, तो मधला माणूस कोण हे शोधले पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शोधून काढावे, तशी मागणी आपण त्यांच्याकडे करणार असल्याचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
अंतरवाली येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी आपण करणार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.

अंतरवाली सराटीतील लाठीमारानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, ज्यांनी मराठ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांना बक्षीस मिळाले असेल. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. यातून कोणालाही सुट्टी नाही. जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर जरांगे म्हणाले, माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरे यांचे म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो, वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...