ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून बसलेत : जनआक्रोश यात्रेतून लक्ष्मण हाके यांचा पवारांवर टीका
जालना / नगर सह्याद्री
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यात चांगलाच पेटलेला असताना आज जालन्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके जनआक्रोश यात्रा काढत आहेत. मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे पॉलिटिस स्क्रिप्ट वरती काम करत आहेत असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नाही असे म्हणत महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोपाचे काय असा सवाल करत आमच्यात फूट पाडण्याचे काम जरांगे करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. या प्रश्नावर शरद पवारांनी बोलायला हवे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे.
मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवे असे म्हणत ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय.