spot_img
अहमदनगरशेतकर्‍यांची वाटण्यात कोट्यावधींची जुगार!

शेतकर्‍यांची वाटण्यात कोट्यावधींची जुगार!

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुयासह परिसरात वाटाण्याचे पीक शेतकरी घेत असतात. हा वटाणा सध्या विक्रीला येत असून काही दिवसापूर्वी दीडशे पार असलेले बाजार ६० ते ७० वर येऊन पोहोचला आहे. आवक वाढली असली तरी मालाची गुणवत्ता नसल्याने बाजार भाव कमी झाल्याचे व्यापार्‍यांकडून बोलले जात आहे. तर शेतकर्‍यांनी वाटण्यात कोट्यावधीची जुगार खेळून हाती असलेले भांडवल ही मातीत घातले.

या वर्षी शेतकर्‍यांनी घातलेले भांडवलही निघाले नाही त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे जवळ असलेले पैसे बियाण्यात घातले. तालुयातील शेतकर्‍यांनी सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयेची बियाणे यावर्षी शेतात पेरले. त्यातून आर्थिक फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न होता उलट त्यासाठीचा दुपटीने खर्च शेतकर्‍यांचा झाला. यामुळे जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांचा तोटा शेतकर्‍यांना झाला. त्यामुळे कोट्यावधीचा जुगार तालुयातील शेतकर्‍यांनी खेळला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने तालुयातील शेतकरी वाटाणा या पिकाकडे वळले. शेतकर्‍याला पुढील पिकासाठी आर्थिक दृष्ट्या भांडवल वाटाणामूग या पिकातून होत असते. मात्र यावर्षी खराब हवामान यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.तालुयातील पारनेर कान्हूरपठार हे वाटाणा पिकासाठी मुख्य आगार मानले जाते. यासह तालुयात मोठ्या प्रमाणात वाटाण्याची पेरणी झाल्या पारनेर परिसरात बुगेवाडी सिद्धेश्वरवाडी तराळवाडी हंगे वडनेर हवेली गोरेगाव डिकसळ आदी भागातील वाटाणा सध्या बाजारात येत आहे. चाळीस किलोची बॅग ७ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत शेतकर्‍यांनी खरेदी केली. एका वटाण्याच्या गोणीला उत्पादन खर्च १५ ते २० हजार रुपये पर्यंत आला. मात्र त्या तुलनेत बाजार भाव ५० ते ६० रुपये त्यादरम्यानच आले आहेत. सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकावर बुरशी व रोगराईचा प्रादुर्भाव आहे. त्यामूळे या मोसमात उत्पादन कमी निघत आहे.

गुणवत्ता नसल्याने भाव पडले
पारनेर तालुयातील वटाणा हा खाण्यासाठी चवदार असल्याने या वाटाण्याला बडोदा अहमदाबाद सुरत, मुंबई, जळगाव, पुणे येथे मागणी आहे. मात्र यावर्षी सतत ढगाळ वातावरण व रोगराईमुळे वाटण्याला गुणवत्ता नसल्याने बाजार कमी झाले. तसेच उत्पादनही कमी असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला तर मागणी असूनही गुणवत्ता व तेवढा पुरवठा होत नसल्याने वटाणा बाजारात मंदी आहे.
-अनिल बढे (वटाणा व्यापारी)

उत्पादन खर्च देखील मिळत नाही.
वाटाण्याची ४० किलोची गोणी पेरली तिला ६० उत्पादन मिळाले. त्यासाठीचा उत्पादन खर्च पंधरा ते वीस हजार आला. त्या गोणीचे ५ हजार रुपये झाले. पंधरा हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती तालुयातील सर्व शेतकर्‍यांची आहे. त्यामुळे वाटाणा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान मोठे झाले असून उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.
-सुरेश शिंदे (वटाणा उत्पादक शेतकरी)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...