नगर सहयाद्री / नागपूर :
नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दरम्यान ठाकरे गटाची मॅरेथॉ़न सुनावणी, उलटतपासणी झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरु झाली आहे.
यामध्ये आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या उत्तरांनी चर्चांना उधाण आले आहे. सुनील प्रभू यांनी व्हीप बजावलेला परंतू तो आपल्याला मिळाला नाही असे लांडे यांनी सुरवातीला सांगितले होते. परंतु त्या संदर्भात कामतांनी एक ईमेल आयडी दाखवला. हा मेल आयडी आपलाच असल्याची कबुली दिली. दरम्यान या मेल आयडीवर दोन मेल प्रभूंकडून गेल्याचे त्याना विचारले असता लांडे यांनी भावाने आपल्याला सांगितले की जोशींच्या मेलवरून मेल आला होता, अशी कबुली लांडे यांनी दिली.
य़ा मेलचा घटनाक्रम २ जुलै २०२२ चा आहे. तर ४ जुलैला भरत गोगावले यांनी जारी केलेला पक्षादेश कसा मिळाला, असे विचारले असता लांडे यांनी आपल्या हातात दिला गेला असे सांगितले. परंतू पोचपावती दिली का असे विचारले असता आठवत नसल्याचे उत्तर लांडे यांनी दिले आहे.
वर्षा बंगल्यावरील बैठकीमधील व्हीप बाबत माहिती
२१ जून रोजी वर्षा बंगल्यावरील बैठकीत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का? असा सवाल कामत यांनी लांडे यांना केला होता. त्यावर लांडे यांनी आपल्याला व्हीप मिळाला नाही, गुलाबराव पाटील या व्यक्तीचा फोन आला होता, त्यावरून मी तिकडे गेलो होतो, असे सांगितले. तसेच तेथील अटेंडन्स शीटवर माझीच सही असल्याचे लांडे म्हणाले.