spot_img
देशआई कुस्ती जिंकली, मी हरलेय...

आई कुस्ती जिंकली, मी हरलेय…

spot_img

कुस्तीपटू विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा | सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

पॅरिस | वृत्तसंस्था

आई, कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन,असे म्हणत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा केला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
पॅरिस ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या विनेश फोगटला १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे तिचे सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगले. त्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला रामराम केला आहे. मंगळवारी (ता.६) विनेशने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी (ता.७) सकाळी विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?
विनेश फोगटकडे सार्‍या भारताचे लक्ष होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आणि सुवर्ण पदक मिळवण्याचे तिचे स्वप्न भंगले. महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. बुधवारी सकाळी फायनल पूर्वी वजन मोजल्यानंतर अधिकार्‍यांना तिचे वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळले. भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला. मात्र वजन घटवता न आल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं.

विनेशची कुस्तीतील कारकीर्द?
२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत विनेश फोगटने तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. यावेळी तिने सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण त्यादरम्यान तिला पदक मिळवण्यात अपयश आले. २०१८ मध्ये विनेशने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती टोकियो ऑलिम्पिकचा भाग राहिली. त्यानंतर २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलम्पिकमध्ये तिला सुवर्ण जिंकण्याची संधी होती. मात्र तिची ही संधी हुकली आहे. त्यासोबतच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला.

अंतिम फेरी गाठून इतिहास रचला
29 वर्षीय महिला कुस्तीपटू विनेश यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करताना इतिहास रचला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या. अशाप्रकारे त्यांना 50 किलो कुस्ती प्रकारात रौप्य पदकही निश्चित होते. एक तरी पदक निश्चित होईल, असा विश्वास संपूर्ण देशाला वाटत होता.

विनेश यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) तीन कठीण सामन्यांमध्ये भाग घेतला, ज्यामुळे त्यांच्या शरीरात डिहायड्रेशन झाले होते. यानंतरही,त्यांनी फक्त थोडेसे पाणी प्यायले, त्याचे केस कापले आणि व्यायाम केला, हे सुनिश्चित करण्यासाठी की त्यांचे वजन निर्धारित वजन मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही. मात्र, बुधवारी मिळालेल्या निराशेने त्यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. यानंतर शरीरात पाणी कमी झाल्याने विनेश फोगट यांना पॉली क्लिनिकमध्ये नेण्यात आले.

यूडब्ल्यूडब्ल्यू नियम काय सांगतात…
विनेश फोगट यांना ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या नियमांवरही चर्चा होऊ लागली. नियमांनुसार, कुस्तीपटूला वजनाच्या कालावधीत अनेक वेळा स्वतःचे वजन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वजनाच्या वेळी खेळाडू उपस्थित नसल्यास किंवा अपात्र ठरल्यास त्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर काढले जाते. अशा प्रकारे ते शेवटच्या स्थानावर राहतात आणि त्यांना कोणतीही रँक मिळत नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...