spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: बाजारपेठेत तरुणावर खुनी हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime: बाजारपेठेत तरुणावर खुनी हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
शिवसेनेचे पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर १२ मे रोजी झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी पुन्हा भर बाजारपेठेत तेलीखुंट तरुणावर टोळयाने हल्ला केल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत प्रशांत काळे (रा. मंगलगेट, नगर) हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२ मे रोजी झालेल्या वादातूनच हा हल्ला झाला आहे. आमची गाडी फोडतो काय, असे म्हणत टोळयाने हल्ला केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

मयूर राऊत, बारया (पूर्ण नाव, पत्ता नाही) व इतर दोन अनोळखी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मंगलगेट परिसरात दोन गटात राडा झाला होता. यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, त्यात राऊत व काळे यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. याच वादातून गुरुवारी पुन्हा प्रशांत काळे या तरुणावर चार जणांच्या टोकळ्याने हल्ला केला. काळे हे त्यांच्या टेम्पोतून जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांच्या टेम्पोला गाडी आडवी लावून टेम्पो थांबवला. काळे यांना बाहेर काढून दांडयाने मारहाण केली.

टोळयाने हातात दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही बाजारपेठेत केला. अचानक घडलेल्या या घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या टेम्पोचीही तोडफोड केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात काळे यांनी गाडीची तोडफोड केल्याने त्याचा बदला म्हणून त्यांना मारहाण करत त्यांच्या टेम्पोची तोडफोड करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस हल्लेखोरांचा तपास कोतवाली करीत आहेत. दोघांची नावे निष्पन्न झाली असून, इतर दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. दरम्यान, घडलेली घटना चुकीची असून, कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आरोपींना अटक करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असे अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावेडीतील बहुचर्चित मॉडेल रोडची काळेंकडून पोल खोल; दीड वर्षात रस्ता गायब

चार कोटींवर डल्ला | दीड वर्षात रस्ता गायब अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील बहुचर्चित मॉडेल...

धक्कादायक! महिलेची पावणे दोन कोटींची फसवणूक, असा घडला प्रकार…

अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी...

डॉ. सुजय विखेंचा थोरातांवर हल्लाबोल, काय म्हणाले पहा…

शिर्डी | नगर सह्याद्री मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित...

विखेंची कोंडी करताना थोरातांचीच होऊ नये म्हणजे बरं!

सारीपाट / शिवाजी शिर्के नगरच्या किल्ल्याचा किल्लेदार ठरवला जाणार | लोणीत तळ ठोकला असला तरी...