spot_img
अहमदनगरकेडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री बायपास रस्त्यावर टोल नाक्याजवळ घडली होती. याप्रकणी प्रतिक विलास चव्हाण (वय २४, रा. वडगाव गुप्ता) यांच्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणातील आरोपींना कोतवाली पोलीसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. संदिप बाळासाहेब थोरात (वय- ४२ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर), कार्तीक संदिप थोरात ( वय १८ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर),रोहित संतोष चाबुकस्वार ( वय २१ वर्षे रा. ओम स्वीट पाठीमागे भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड सावेडी ) यांना अटक करण्यात आली आहे.

संदीप थोरात याने चव्हाण याला फोन करून माझा मुलगा कार्तीक हा तुझ्याकडे येईल व तुझ्या पैशाचा व तुझा हिशोब करेल असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात तिघे दुचाकीवरून आले व त्यांनी तू पैसे का मागतो, असे म्हणत टोळक्याने चव्हाण यांना अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.

सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सदर गुन्हयाची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दारोडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणेकामी सुचना देवुन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपींना जेरबंद केले आहे

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि / विकास काळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ए. पी. इनामदार, दिपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, नकुल टिपरे, मोहन भेटे, सुजय हिवाळे, सुरज कदम, संकेत धिवर, अनुप झाडबुके, राम हंडाळ, यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...