नागपूर। नगर सहयाद्री
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात सुरु झालेले अधिवेशन गरम झालेले पहायला मिळत आहे. पहिल्याचं दिवशी पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी डॉक्टरांची वेशभूषेत साकारत विधानभवनात पोहचले आहे.
आपल्या कामाच्या माध्यमांतून आमदार रवींद्र धंगेकर प्रसिद्ध आहे. राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अंदोलनेही उभारली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात स्टेथोस्कोपचा आणि अंगावर अप्रॉन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात आले. धंगेकराच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
काय आहे आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी?
ड्रग्ज प्रकरणात समोर आलेल्या ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ससून रुग्णालयाच्या ‘डीन’ने तब्बल नऊ महिने ललित पाटीलला पंचकारित सेवा दिली होती. याप्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक देखील झाली आहे. मात्र संजीव ठाकूर यांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही. याप्रकरणी सरकारने लक्ष दिले पाहिजे आणि संजीव ठाकूर यांना ज्याज्या मंत्र्यांनी फोन केले त्यांची देखील चौकशी केली पाहिजे.
– आमदार रवींद्र धंगेकर