spot_img
अहमदनगरनगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीचा गुरुवारी शिल्पकार भानुदासजी एकनाथ कोतकर नामकरण...

नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीचा गुरुवारी शिल्पकार भानुदासजी एकनाथ कोतकर नामकरण सोहळा

spot_img

भव्य कार्यक्रमाचे आयोजन | सभापती बोठे, उपसभापती सूळ यांची माहिती

सुनील चोभे / नगर सह्याद्री –
नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदासजी एकनाथ कोतकर नावाने नामकरण सोहळा गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजाता होणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे  व उपसभापती रभाजी सूळ यांनी दिली.

नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवाराचे भाग्य विधाते भानुदास कोतकर  यांनी २ जानेवारी २००६ रोजी सभापती पदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १ कोटी ७० लाख ५८ हजार होते. नगर येथील मुख्य यार्डवर कांदा या शेतीमाल उतरविण्यासाठी जागा कमी पडत असल्याने संपूर्ण शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होत होता. नगर तालुयाच्या कार्यक्षेत्रातील कांदा हा इतर मार्केटमध्ये विक्रीसाठी जात असल्याने त्याचा बाजार समितीच्या उत्पन्नावर विपरीत परीणाम होत होता. भानुदास कोतकर यांनी माजी आमदार  शिवाजीराव कडीले यांच्याशी चर्चा करुन तत्कालिन संचालक मंडळ यांना बरोबर घेऊन बाजार समितीचे उत्पन्न वाढीचे दृष्टीने व शेतकर्‍यांना त्याचा शेतीमाल नगर च्या बाजार समितीतच विक्रीची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने शहरालगतच नेप्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये ३० एकर जागा खरेदी केली. या कामासाठी माजी आमदार कर्डीले यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. संपूर्ण जागेचे सपाटीकरण करुन त्या ठिकाणी ७८ हजार स्क्वेअर फुटाचे कांदा ग्रेंडिग शेडची उभारणी केली. तसेच त्या ठिकाणी ४२३ व्यापारी व कमर्शिअल गाळयांचे बांधकाम करुन भव्य प्रशासकीय इमारत बांधकाम केले.

संपूर्ण यार्डमध्ये काँक्रीट रस्ते, ड्रेनेज लाईनचे बांधकाम तसेच विद्युत व्यवस्था करून संपूर्ण यार्डवर हायमेस लाईटची व्यवस्था केली. शेतकर्‍यांच्या मालाचे संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण यार्डला वॉल कंम्पाऊंड केले. वजनामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक होवू नये म्हणून प्रत्येक आडत्याकडे मापाड्याची नेमणूक केली. यार्डातच ५० टनी वजन क्षमतेचे दोन भुईकाट्याची उभारणी केली. उघड लिलाव पध्द्तीने कांदयाचे लिलाव होत असल्याने शेतर्‍यांस त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत आहे. सर्व सुविधा मिळत असल्याने नेप्ती उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्यांची आवक होत आहे.

तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांनी केलेल्या नेप्ती उपबाजार समितीच्या उभारणीमुळे व त्यांच्या दूरदृष्टीमुळे नगर तालुयातील शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून समजली जाणारी नगर कृषि उत्पन्न बाजार समिती राज्यातील प्रमुख बाजार समिती म्हणून उदयास आलेली आहे. मागील वर्षाचे बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे 16 कोटी 70 लाख 91 हजार 719 रुपये झाले आहे. त्यामध्ये भानुदास कोतकर यांचा मोलाचा वाटा आहे.

बाजार समितीने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन शेतकर्‍यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे नेती उपबाजार समितीमध्ये अहमदनगर जिल्हा, बीड, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्हयामधून कांदा या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. या बाबींचा विचार करुन माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, संचालक मंडळ व नगर तालुयातील शेतकरी यांनी नेप्ती उपबाजार समितीस भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. सदरचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी नेप्ती उपबाजार समिती येथे होणार आहे.

हा कार्यक्रम पालकमंत्री तथा महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाने अध्यक्ष जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, सुरेखाताई कोतकर, आमदार संग्राम जगाताप, युवा नेते अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष  दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नगर तालुयातील शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती  रभाजी सुळ व संचालक मंडळ यांनी केले आहे. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...