spot_img
अहमदनगरशासनाची कढी अन् धावू-धावू वाढी! " लोणी व नगरच्या नेत्यांना ...."; राष्ट्रवादीच्या...

शासनाची कढी अन् धावू-धावू वाढी! ” लोणी व नगरच्या नेत्यांना ….”; राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी घेतला भाजपाचा समाचार

spot_img

राहुरी । नगर सहयाद्री:-
मागील दहा वर्षात काही न करता केवळ दिवे व सभामंडप एवढेच काम करून साडेचार वर्ष झोपी गेलेल्या आपल्या नेत्यांना आता जनतेने नाकारले आहे. त्यांचे खरे रूप ओळखल्याने त्यांचीच भलामन करणारे कार्यकर्ते आज तनपुरेंव र बाजारपेठ उद्ध्वस्त केल्याचे आरोप करीत आहे. ही बाब हास्यास्पद असल्याची खिल्ली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब मिटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भारत तारडे, नंदकुमार तनपुरे यांनी संयुक्त पत्रकातून उडविली आहे.

याबाबत विस्तृत उत्तर देताना ज्यांनी दहा वर्षात नगरपरिषदेला कधी एक रुपया आमदार निधीतून दिला नाही तेच आता आ. प्राजक्त तनपुरेंनी प्रयत्नपूर्वक २९ कोटीची पूरक पाणी योजना सह भुयारी गटावर इतर कामेजी मार्गी लावली त्याचे श्रेयघेत आहे. आपल्या मंत्रिपदाचा उपयोगातून जास्तीत जास्त शेती व शेतकरी सुसहा होण्यासाठी ऊर्जा खात्यासंबंधातील कामे पूर्ण करून घेतली. परंतू चार वर्षे झोपी गेलेले निवडणुका येताच कामांचे श्रेय घेताना उद्घाटनाचा अट्टाहास करीत आहेत.

मुळा-प्रवरा नेमकी कोणी बंद पाडली? त्यावेळी पाच वर्षे कोण चेअरमन होते? तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांशी नेमके कोणाचे वैयक्तिक वाद होते व यातून संस्था कशी गेली हे सर्वज्ञात असताना प्रीपेड कार्यकर्ते इतरांवर आरोप करीत आहेत. वास्तविक गेल्या दहा वर्षात राहुरीच्या ना रुग्णालयाचा विषय, ना शासकीय इमारतींचा विषय विधानसभेत निघाला. ना बसस्थानकाचा विषय मार्गी लागला, गेल्या पाच वर्षात आ. प्राजक्त तनपुरे यांनी अभ्यासपूर्वक मांडणी करून या विषयांना चालना दिली. रुग्णालयाबाबत स्वतः गावात रुग्णालय होण्यासाठी जागेबाबतचे वाद सोडवले. विधानसभेत यासाठी प्रश्नही उपस्थित केले.

परंतु, विधानसभेत व अपघाताने एकदा मंत्री पदही मिळालेले यांचेच लोकप्रतिनिधी कधीही विधानसभेत प्रश्नावर बोलताना जनतेला दिसले नाही, तेच कार्यकर्ते तनपुरेंबर बाजारपेठ उध्वस्त केल्याचा आरोप करतात. वास्तविक, राहुरी आणि तनपुरे यांचे अतूट नाते आहे. सहकारी सूतगिरणी नेमकी कोणाच्या काळात बंद पडली? पीपल्स बैंक कोणी घालवली? राहुरी कारखान्याला केवळ राजकीय हेतू ठेवून ४४ कोटींचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा बँकेचे कर्ज हे आज कारखाना अडचणी त येताना कारणीभूत ठरले आहे. मग हे नेमके कोणी व कशासाठी केले? याचा शोध आरोप करताना हुशार कार्यकर्त्यांनीघ्यावा व मग तनपुरेंवर आरोप करावे.

राहुरीतील जनता हुशार आहे. तुम्हाला स्पष्टपणे नाकारलेले आहे.निळवंडे कालव्याचे खोटी भूमिपूजन कोणी केली ? आ. तनपुरे यांनी आपत्या अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात साडेबाराशे कोटीचा निधी आणून हे काम कोणी मार्गे लावले? हे या भागातील जनतेला चांगलेच समजते. यांना राहुरीचे काही घेणेदेणे नाही. फक्त राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा लोणी व नगरच्या नेत्यांना राहुरीचे तारणहार म्हणणाऱ्या कार्यकत्यांची किव करावी तेवढी थोडीच आहे. परंतु, निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडी करून मिळालेले राज्याच्या सतेतून काहीही न करता हे सर्व आम्हीच केले, असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न जो होत आहे. त्याला जनता पुरेपूर ओळखून असून दोन महिन्यानंतर मतदानातूर जनता या प्रश्नाचे उत्तर नक्की देईल, असा विश्वास बाबासाहेब मिटे, भारत तारडे, नंदकुमार तनपुरे यांनी व्यक्त केला.

‘शासनाची कढी अन् धावू-धावू वाढी
संजय गांधी निराधार योजनेचे चेक वाटप कार्यक्रम करून मी मोठे काम जनतेसाठी करतो, सामान्यांविषयी मला फार कळकळ आहे, हे दाखविणाऱ्यांनी ही कॉग्रेसची योजना आहे व हा दैनंदिन प्रकरणे मंजूर होऊन गेल्या पन्नास वर्षांपासून चा भाग आहे. यात वेगळे काही तुम्ही करत नाही हे लक्षात ठेवा, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...