spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: नितेश राणेंचे फोटो स्टेट्सला ठेवले, पुढे कॉलेजच्या गेटवर नको तेच...

Ahmednagar Crime: नितेश राणेंचे फोटो स्टेट्सला ठेवले, पुढे कॉलेजच्या गेटवर नको तेच घडले; अहमदनगरमधील खळबळजक प्रकार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सरला बेट चे महंत रामगिरी महाराज व भाजपा आ. नितेश राणे यांच्या दि. २ सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो स्टेट्सला ठेवल्याने त्याचा राग येवून चौघांनी महाविद्यालयाच्या गेटवर युवकावर चॉपर, फायटर ने हल्ला करत कंबरेच्या बेल्ट ने गळा आवळून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेजच्या गेटवर बुधवारी (दि.४) सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली.

याबाबत प्रदीप भागीनाथ विठेकर (वय १७, रा. वांजरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर) याने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी रिजवान शेख व त्याच्या ३ अनोळखी साथीदारांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विठेकर हा श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयाच्या स्टेट्सला सरला बेट चे महंत रामगिरी महाराज व भाजपा आ. नितेश राणे यांच्या दि. २ सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो ठेवले होते.

याचा राग येवून रिजवान शेख व त्याच्या ३ अनोळखी साथीदारांनी प्रदीप याला बुधवारी (दि.४) सकाळी १०.१५ च्या सुमारास कॉलेजच्या गेटवर अडवून त्याला कंबरेच्या बेल्ट ने तसेच चॉपर, फायटरने मारहाण करून जखमी केले. तसेच बेल्टने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...