नगर सह्याद्री टीम : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोदी सरकार 81.35 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. गेल्या वर्षी सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, त्याची शेवटची तारीख जवळ येण्याआधीच स्वस्त पीठ बाजारात उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे. गहू आणि वाटाण्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता स्वस्त दरात पीठ विकण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. एका रिपोर्टनुसार, भारत ब्रँडअंतर्गत सरकार 27.5 रुपये प्रति किलो दराने पीठ विकणार आहे.
7 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा
7 नोव्हेंबरपासून पिठाची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात ब्रँडेड पिठाचा भाव 35 ते 40 रुपये किलो आहे. त्याच वेळी, मध्य प्रदेशात गव्हाच्या पिठाचा दर सुमारे 45 रुपये प्रति किलो आहे.
साधारण ब्रँडेड पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 370 रुपयांना मिळते. सरकार मात्र भारत ब्रँडचे पीठ 275 रुपयांना मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला नोडल एजन्सी बनवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
10 आणि 30 किलोचे पॅकेट
गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये बाजारात उपलब्ध केले जाईल. या पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 275 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारकडून स्वस्तात हरभरा डाळही भारत ब्रँड नावाने विकली जात आहे. त्याचा दर 60 रुपये किलो आहे. 30 किलोच्या मोठ्या पॅकेटची किंमत 55 रुपये किलोच्या हिशोबाने आहे.
मोफत रेशन योजनेबाबत अपडेट नाही
मोफत रेशन योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला आहे. मात्र, ही योजना पुढे नेली जाणार की नाही, याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मात्र, सरकारकडे गव्हाचा बफर स्टॉक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना पुढे सुरु राहील कि नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.