अहमदनगर । नगर सहयाद्री-
भाजीपाल्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. तीव्र ऊन आणि पाणीटंचाईचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. भाजीपाला उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचाच परिणाम भाजीपाल्याच्या दर वाढीवर होते आहे.
नगरमध्ये भाजीपाला उत्पादनाला तीव्र ऊन आणि पाणी टंचाईचा जबरदस्त फटका बसला. ऊन्हामुळे भाजीपाला पिवळा पडत होता आणि पाणी नसल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत होती. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा आवक कमी झाली आहे. कांदा, बटाटा, टॉमेटोचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
कोथिंबीर, हिरवी मिरली, कारलं, शेवगा यांसारख्या भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणाटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतजमिनींना योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्याचाचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येत्या काळात भाजीपाल्यांचे दरात घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे दर का वाढतात?
1. उत्पादनावर परिणाम
पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अनिश्चित असते. यामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि उत्पादन कमी होते.
2.साठवणूक आणि वाहतूक अडचणी
पावसाळ्यात रस्ते खराब होण्यामुळे वाहतूक अडचणी येतात. यामुळे भाज्यांचे वितरण विलंबीत होते आणि दर वाढतात.
3.पुरवठा आणि मागणी
पुरवठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे दर वाढतात.
4.रखडलेले उत्पन्न
पावसाळ्यातील अति पावसामुळे काही वेळा पिके नष्ट होतात किंवा खराब होतात. यामुळे भाज्यांचे दर वाढतात.
हे सर्व घटक मिळून भाज्यांचे दर वाढण्यास कारणीभूत ठरतात.