पारनेर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या तिसरी पिढीची नाळ पारनेरशी जोडली असून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील १३ गावांतील सभामंडपासह इतर विकास कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील व प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, विखे कुटुंबाचे दौरे हे लोकांचे व समाजाचे प्रलंबित सोडविण्या साठी होत आहे.त्यामुळे हे दौरे लाभदायक ठरत आसुन राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पारनेर तालुक्यातील सुचवलेल्या २५१५ योजनेंतर्गत विविध कामांना हा निधी मंजूर झाला आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विविध योजनेंतर्गत पारनेर तालुक्यातील विकासकामांना सर्वाधिक निधी मंजूर केला आहे.तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या कामांना निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय, पथदिवे, स्मशानभूमी सुशोभीकरण, बाजार ओटे यासंह अन्य कामांचा समावेश आहे.
मंजूर कामे व निधी असा; गारखिंडी नुतन ग्रामपंचायत कार्यालय (१० लाख), गटेवाडी गावठाण स्ट्रीट लाईट (७ लाख), पळवे खुर्द मारूती मंदिर पत्रा सभामंडप (८ लाख), कातळवेढा दत्तमंदिर पत्रा शेड सभामंडप (८ लाख), गुरेवाडी दुर्गामाता मंदिर पत्राशेड सभामंडप (८ लाख), म्हसोबाझाप म्हसोबा मंदिर पत्राशेड सभामंडप (८ लाख), धोत्रे खुर्द स्मशानभूमी सुशोभीकरण (७ लाख), अक्कलवाडी अक्काबाई मंदिर पत्राशेड सभामंडप (५ लाख), वडझिरे येथे बाजार ओटे व पत्रा शेड बांधणे (१० लाख), पाडळी दर्या स्मशानभूमी सुशोभीकरण (८ लाख) भोयरे गांगर्डा मळगंगा मंदिर पत्रा शेड सभामंडप (८ लाख), वडगाव गुंड मारूती मंदिर पत्रा शेड सभामंडप (८ लाख), गाडीलगाव वेताळबाबा मंदिर समोर पेव्हींग ब्लॉक बसविणे या कामांना एकूण एक कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे.