spot_img
अहमदनगरविधानसभेसाठी सुजय विखेंनी थोपटले दंड; कोणत्या मतदार संघातुन लढणार केले स्पष्ट?

विधानसभेसाठी सुजय विखेंनी थोपटले दंड; कोणत्या मतदार संघातुन लढणार केले स्पष्ट?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणूकीत अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच आता भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीबाबत सूचक असे वक्तव्य केले आहे. ज्या तालुयात उमेदवारी बाबत समन्वय होणार नाही अशा मतदारसंघात मी निश्चित निवडणूक लढविणार आहे. संगमनेर किवा राहुरी हा मतदारसंघ माझ्यासमोर पर्याय असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत नगरच्या जनतेने डॉ.सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

लोणी येथे डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौर्‍यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदार संघातून ना.राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून, आमच्या कुटूंबाच्या दृष्टीने सुध्दा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डी मधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आ.राम शिंदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्छा व्यत केली असेल तर, यात गैर काही नाही, असेही ते म्हणाले,

पुढे बोलतांना विखे म्हणाले, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली, तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुयात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सुचक असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मी विधानसभा निवडणूकीसाठी तयार..
उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुयात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फत अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सुचक वतव्य माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...