spot_img
अहमदनगरAhmednagar Politics News :'बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते'; खा. नीलेश...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:-
जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला फसवता येते, असा टोला माजी खा.सुजय विखे यांचे नाव न खा.नीलेश लंके यांनी लगावला. मी बोलबच्चन करणारा कार्यकर्ता नाही. शेतकर्‍यांचे, रस्त्याचे तसेच घोड, कुकडी आणि साकळाई प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. नीलेश लंके यांनी केले.

श्रीगोंदा तालुयातील कोळगाव येथील कोळगाव सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी खा.निलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेस नेते घनश्याम शेलार, प्रतापसिंह पाचपुते, प्रेमकाका भोईटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनिषा मगर, जालिंदर निंभोरे, शंकरराव लगड, राजेंद्र नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, वाढत असलेल्या खासगीकरणात सहकार क्षेत्राचा मोठा आधार असून गाव पातळीवर काम करणार्‍या विविध सहकारी सेवा संस्था याच खर्‍या अर्थाने ग्रामीण विकासाचा कणा आहे.सहकारी संस्था बंद पडल्या तर शेतकर्‍यांना कोणी वाली राहणार नाही. कर्जाच्या प्रमाणात वसुली नगण्य असल्याने सहकारी संस्थासह जिल्हा बँक येणार्‍या काळात अडचणीत येण्याची शयता असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. विकासाचे दृष्टी ठेवणारे नेते आणि कार्यकर्ते कोळगाव येथे असल्याने गावाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू असल्याचे घनश्याम शेलार यांनी सांगितले.संस्थेचे चेअरमन हेमंत नलगे यांनी संस्थेचे ४०३० सभासद असून संस्थेच्या माध्यमातून ४५ कोटींचे कर्ज वाटप असल्याचे सांगितले.

संस्थेच्या कारभाराविषयीना माहिती दिली. यावेळी बाळासाहेब नलगे, दिनकर पंदरकर, सरपंच पुरुषोत्तम लगड, सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के, रामदास झेंडे, संतोष लगड यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कारभारात योगदान देणार्‍या माजी चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह आजी-,माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संचालक नितीन डूबल, सुनील दरेकर, भास्करराव वागस्कर, विलास नलगे, सुभाष शिंदे, योगेश भोईटे, उपसरपंच माया मेहेत्रे, मधुकर लगड, अमित लगड, योगेश मगर, विनायक लगड, संकेत नलगे, गोटू लगड, नंदकुमार लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, विजय नलगे, सुनील काकडे यांच्यासह सर्व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय नलगे, दादासाहेब निर्फळ यांनी केले. तर आभार संस्थच्या व्हा.चेअरमन लीलाबाई थोरात यांनी मानले.

‘साकळाई’साठी मंत्रालयात आंदोलन
निवडणुकीपर्यंत वातावरण टिकवायचे म्हणून साकळाई पाणी योजनेसाठी आंदोलन करणारा मी कार्यकर्ता नाही. साकळाई प्रश्नासाठी रस्ते बंद करून आपल्या माणसांची पिळवणूक करण्यापेक्षा मंत्रालयात आंदोलन करून मंत्रालय बंद करून योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खा.लंके यांनी यावेळी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...