spot_img
देशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी; काय म्हणाले पहा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी; काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान आता पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्गयेथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “आमचे संस्कार वेगळे आहेत. त्या लोकांसारखे नाहीत, जे महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे. मात्र, त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही, विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. हे आमचे संस्कार आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या १० वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कारर्यकाळ असो. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाष्ट्राजवळ विकासासाठी संसाधनं आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे, त्यामुळेच आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. या बंदरासाठी जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“२०१४ आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचं आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...