मुंबई । नगर सहयाद्री-
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना काळापासून सुरु झालेल्या योजनेत मुदत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगढच्या दवऱ्यावर आहे. दरम्यान प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ८० कोटी गरीब जनतेला मोफत धान्य देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ देण्याची मोठी घोषणा केली आहे.