मुंबई। नगर सहयाद्री-
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शयता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने काल (२६ फेब्रुवारी) हजेरी लावली. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. कडकडाट आणि वादळी वार्यांसह पाऊस झाला.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुयाला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुयातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुयातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, संत्रा पिकाला तडाखा बसला आहे. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसत आहे. वादळी वार्यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने नुकसान झाले.