नगर सह्याद्री टीम-
खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफाईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही.
खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.आर्युवेदानुसार खडीसाखर ही थंड गुणधर्म असलेली आणि वात, पित्त, कफ यांचे संतुलन राखणारी आहे. रिफाईंड साखरेपेक्षा खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम असते.
खडीसाखरेमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो असिड असतात. भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून मिळू शकते. एका पंधरा ग्रॅमच्या खडीसाखरेतून तुमच्या शरीराला जवळजवळ६० कॅलरिज मिळतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर उपयोगाची नक्कीच आहे.
खोकला सुरू झाल्यावर तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवल्यास खोकला थोडावेळ थांबेल. खडीसाखर तोंडात ठेवल्यास घशाचं इनफेक्शन कमी होईल. शिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यामुळे तुमच्या खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल.
खडीसाखरेमुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर दूधामधून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.अशक्त लोकांनी नेहमी त्यांच्याजवळ खडीसाखर ठेवावी. ज्यामुळे जेव्हा अचानक थकवा जाणवेल तेव्हा खडीसाखर तोंडात ठेवावी.