Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ आता अंतिम टप्प्यात आहे, दोन आठवड्यापूर्वी आलेला संग्राम चौगुले अवघ्या 14 दिवसात घराबाहेर गेला आहे. संग्रामने दोन आठवड्यांपूर्वी घरात प्रवेश केला होता, परंतु कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेण्यासाठी घराबाहेर जावे लागले.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या संग्राम चौगुले बाहेर आल्यावर पहिली सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात संग्रामने लिहिलं की, “गंभीर दुखापतीमुळे मला बिग बॉस घरातून बाहेर जावं लागलं. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद! पुन्हा आपली भेट लवकर होईल. तुमच्या मिळालेल्या प्रेमामुळे मी लवकर बरा होईन. ” असे म्हटलं आहे.
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस’ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तो घरातील आपली नावाची पाटी घेऊन घराबाहेर पडतो. अनेक सदस्य त्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करतात. मात्र सध्या अरबाजला वाचवण्यासाठी संग्रामला बाहेर काढल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.