spot_img
अहमदनगर"शरद पवारांनी नगरची चिंता...."; मंत्री विखे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा..

“शरद पवारांनी नगरची चिंता….”; मंत्री विखे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

शरद पवार यांनी नगर जिल्ह्याची चिंता करायचे सोडून दिले पाहिजे. संस्था, बँका, कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. जिल्ह्याचे लोक समर्थ आहेत. एवढे वर्ष महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले. ते आता संपुष्टात येत आहे. याची त्यांच्या मनात खंत आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वायबी चव्हाण सभागृहात उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या बोधचिन्ह अनावरण व उद्घाटन पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले होते. यावेळी त्यांनी विखे पाटील व शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता टीका केली होती. त्याला शुक्रवारी नगरमध्ये पालकमंत्री विखे पाटील यांनी उत्तर दिले. विखे पाटील म्हणाले की खंडकरी शेतकर्‍यांसाठी कॉ. माधवराव गायकवाड आणि स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी लढा उभा केला. न्यायालयापर्यंत लढाई दिली. खंडकरींच्या जमिनी द्यायला सुरुवात झाली आहे. त्या जमिनी भोगवटा दोनच्या एक करताना पूर्वीच्या सरकारने करता येत नाही असे म्हटले होते.

आकारी जमिनी खंडाने दिलेल्या नाहीत, अधिगृहित केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना देण्यात अडचण आहे, असे म्हटले होते. परंतु कारखाना बंद पडल्याने आहे त्या स्थितीत शेतकर्‍यांना जमिनी देण्याची गरज होती. मागच्या महसूल मंत्र्यांनी अ‍ॅडव्हकेट जनरल कुंभकोणी यांना आपल्याला जमिनी शेतकर्‍यांना परत करायच्या नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही शेतकर्‍यांना विरोध केला असे सांगितले होते. पूर्वीचे महसूल मंत्री हे शेतकरी विरोधी होते, अशी टिका त्यांनी केली. कोणते महसूल मंत्री अशी विचारणा केल्यावरते तुम्हा शोधा असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...