मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून उद्धव ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. परंतु त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे.
पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. मुंबईच्या कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते यांच्या शब्दाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे.
मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.