spot_img
अहमदनगरधक्कादायक! नगरमध्ये व्यापार्‍यावर हल्ला करुन लुटले, मोठी रोकड पळवली

धक्कादायक! नगरमध्ये व्यापार्‍यावर हल्ला करुन लुटले, मोठी रोकड पळवली

spot_img

अमदनगर | नगर सह्याद्री

नगरच्या नेप्ती कांदा मार्केट मधील आडत व्यापारी सय्यद बंधूंवर बायपास रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी तलवार, कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. तसेच त्यांच्या जवळील सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त रोकड पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि.७) सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. या प्रकारामुळे व्यापारी बांधवामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेप्ती कांदा मार्केट मधील समीर ट्रेडींग कंपनीचे समिर सय्यद व सोहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सय्यद बंधू हे सकाळी ११ च्या सुमारास कार मधून नगरकडून नेप्ती कांदा मार्केट कडे जात होते. केडगाव बायपास चौकातून बायपास रस्त्याने ते नेप्ती कांदा मार्केट कडे वळाले.

चौकाच्या काही अंतर पुढे आल्यावर एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांची कार थांबताच अन्य वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत दोघा बंधूंवर तलवार, कोयत्याने वार केले. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार मध्ये ठेवलेली पैशांची बॅग घेवून तेथून पोबारा केला. या बॅगमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी आणलेली ५० लाखांपेक्षा जास्त रोकड होती.

या हल्ल्याची माहिती मिळताच नेप्ती कांदा मार्केट मधील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघा सय्यद बंधूंना उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सह पोलिस पथकाने घटनास्थळी तसेच दवाखान्यात भेट देत माहिती घेतली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने रुग्णालयात जावून जखमी व्यापाऱ्यांची विचारपूस केली.

बाजार समितीचे संचालक मंडळ, आडते व्यापारी, हमाल मापाडी यांनी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन दिले. सदर हल्ल्याची लवकरात लवकर चौकशी करुन हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यांत यावी, अन्यथा अहमदनगर बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी व सर्व संबंधित घटक हे कोणत्याही क्षणी रस्‍त्यावर उतरुन रस्ता रोको आंदोलन करतील. असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...