अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री –
Ahmednagar Breaking :अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीकरून तिच्याकडे लग्न करण्याची मागणी करणार्या तरूणाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोसो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. पियूश सुंके (रा. दातरंगे मळा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
फिर्यादीची पियूश सोबत दोन वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्याने ते मैत्रिप्रमाणे बोलत होते. दोन महिन्यापूर्वी पियूश फिर्यादीला ‘तू माझ्यासोबत लग्न कर, तू माझी असून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव’, असे म्हणून वारंवार त्रास देत होता. बोलली नाही तर आत्महत्या करून तुझे नाव घेईल, अशी धमकी दिल्याने फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.
पोलिसांनी पियूश याला समज दिली होती. मंगळवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास पियूशने त्याने फिर्यादीकडे लग्न करण्याची, प्रेमसंबंध ठेवण्याचे बोलून तसे केले नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून तुझे नाव घेईल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.