पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर शहरात रोजच कमी अधिक प्रमाणात संततधार पाऊस होत असल्याने शहरातील १७ प्रभागात ठिकठिकाणी पाऊसा मुळे रोडवर खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने तळे निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना सर्कस करत वाट काढावी लागत आहे. पारनेर शहरातील अती महत्त्वाचा व दैनंदिन वर्दळ असलेल्या पारनेर कॉलेजच्या प्रवेश द्वारा शेजारी सिमेंट काँक्रिटचे रोडवर खड्डे पडल्याने घाण पाण्याचे तळे साचले आहे.या साचलेले पाण्यातून या रस्त्यावरून प्रवास करणारे कॉलेज लचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्थानिक नागरिक यांना वाट काढावी लागत आहे.त्या मुळे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पारनेर नगर पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाने तात्काळ दखल घेउन समस्या सोडवण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की,शहरात अनेक प्रभागातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे डबके निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांसह ,नागरिकांना येजा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वार, पारनेर कॉलेज रोड वरील प्रतीक्षा कॉम्प्युटर समोर या मार्गावरील रहदारीच्या मार्गावर पाऊस आला की घाण पाणी साचले जाते .त्यामुळे विद्यार्थी,विद्यार्थिनी,स्थानिक नागरिकाना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर नागरी वसाहत, एक बँक, एक विद्यालय व एक महाविद्यालय आहे. त्या मूळे दैनंदिन वर्दळ भरपूर असते.
रोड वर पाणी साचून राहत असल्याने विद्यार्थ्यांचा नागरिकांना जाता येत नाही त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा चार चाकी वाहन या पाण्यातून भरदार जात असताना अलगद घाणेरडे पाणी अंगावर उडतात त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास होतो. अशीच परिस्थिति कमी अधिक प्रमाणात शहरातील अनेक प्रभागात आहे. पावसाळा सुरू झाला त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी पाणी जमा होते त्या ठिकाणी संबंधित विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.