spot_img
अहमदनगर'शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण बोगस'; शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांचा आरोप

‘शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण बोगस’; शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांचा आरोप

spot_img

अहमदनगर ।नगर सहयाद्री:-
नगर शहरातील मोकाट कुत्रे, रस्त्यावरील खड्डे, कचरा, माती, बंद पथदिवे यांचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेले कुत्र्यांचे निर्बीजकरण बोगस पध्दतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कार यांनी केला आहे.

महापालिकेचे आयुक्त यशंवत डांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. आयुक्तांसोबत चर्चा करतांना बारस्कार यांनी हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी सभापती अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, डॉ.सागर बोरुडे उपस्थित होते.

शहर उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून कुत्र्याच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडत नाही. शाळकरी विद्यार्थ्यांवर शहरात कुत्र्यांचे हल्ले होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महापालिकेच्या माध्यमातून होत असलेले कुत्र्यांचे निर्बीजीकरण बोगस आहे. त्यामुळेच कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर रस्त्यावरील खड्ड्यांची पॅचिंग तातडीने मार्गी लावा, रस्त्यावर मातीचे व कचर्‍याचे ढीग मोठ्या प्रमाणे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात येत आहे.

शहरातील काही भागांमध्ये एलईडी पथदिवे बंद असून. अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रश्न तातडीने मार्गी लावा, अन्यथा ८ दिवसानंतर आंदोलन केले जाईलअसा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. अविनाश घुले म्हणाले की, शहरातील रस्त्यांवर चिकन, मटनचे वेस्टेज टाकले जाते. त्यामुळे मोकाट कुत्रे हिंस्र बनले असून नागरिकांचा बिनधास्त चावा घेत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. यावर महापालिकेचे नियंत्रण दिसून येत नाही.या सर्व गोष्टीवर महापालिकेने नागरिकांना सुविधा पुरवणे गरजेच्या असताना या सर्व बाबी होताना दिसत नाही तरी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न सोडावे अशी मागणी स्थायी समितीचे मा.सभापती अविनाश घुले यांनी केली

शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर काम सुरू असून डेंगू स्वच्छता मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे उचलण्याचे काम देखील सुरू केले आहे. मंगळवारी शहरात २०० कुत्रे पकडले आहे. पिंपळगाव माळवी येथे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. दरम्यान शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रश्नावर उपयोजना केल्या जातील.
– आयुक्त यशंवत डांगे

शहरामध्ये कुत्र्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांनी लक्ष घालून तातडीने सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा शहरात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही. रस्त्यांच्या कडेला माती व कचर्‍याचे ढीग मोठ्या प्रमाणात दिसत. स्वच्छता होणे गरजेचे आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. आयुक्त यांनी नियोजन करून कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
– उपमहापौर गणेश भोसले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...