spot_img
अहमदनगरआमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश! 'ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर मंजूर'

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश! ‘ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर मंजूर’

spot_img

संगमनेर । नगर सह्याद्री
आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदिल दिला असून पुणे – नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे.

३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर तसेच बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांना मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. बोटा येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूरी बाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं...

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...