अहमदनगर | नगर सह्याद्री:-
जुनी वसंत टॉकीज परिसर, पार्श्वनाथ कॉलनी , पूनममोती नगर, तपकीर गल्ली परिसर तसेच शहरच्या विविध भागामध्ये मोकाट कुत्रांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणवर झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण पसरले आहेत.
मनपा प्रशासनाने कुत्रे पकडणारे ठेकेदार यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी केली आहे. अन्यथा शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या आवारात सोडले जातील, असा इशाराही त्यांनी केला आहे.
घुले यावेळी बोलतांना म्हणाले, नगर शहरमध्ये दिवस असो व रात्र विविध भागामध्ये मोकाट कुत्रेच्या झुंडच्या झुंड नागरिकांवर हल्ला करताना दिसत आहे. वाहनचालकाच्या मागे धावणे, पाठलाग करणे यामुळे वाहनचालक घाबरून जातो व कदाचीत वाहनाचा अपघात होऊ शकतो.
शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला, यांच्या अंगावर कुत्रे धावून जातात. जर एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची सर्व जबाबदारी हि मनपा प्रशानाची राहणार आहे. येत्या काही दिवसांत कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास थेट महापालिकेत कुत्रे सोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.