Accident News: बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील तीन जण आणि एक अन्य व्यक्ती, एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये बाबूराव खलंगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे यांचासह एकाचा समावेश आहे.ही घटना रात्री २ वाजता मुसळधार पावसात घडली. चार जण स्विफ्ट कार (क्र. एमएच 24 एएस 6334) ने औरंगाबादकडे जात होते. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 एमव्ही 7188) यांची जोरदार धडक झाली.
अपघातानंतर कारचा चुराडा झाला आणि चौघे जागीच मृत झाले आहे. बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.