Ahmednagar Crime: कटूंबामध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. परिवारात किरकोळ कारणावरून नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, पण काहीवेळा ते विकोपालाही जातात. त्यानंतर गुन्हेगारीच्या मोठमोठ्या घटना घडतात. अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये घडली आहे. किरकोळ वादाच्या कारणावरून दारुच्या नशेत मुलाने वडिलांची हत्या केली.
या दुर्देवी घटनेत विठ्ठल मनाजी केदार (वय ५५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आई अंबिका विठ्ठल केदार (वय ४८) हीने मुलगा सोपान विठ्ठल केदार (वय- २४) रा. मंगरुळ युद्रुक (ता. शेवगाव) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सोपान केदार यास ताब्यात घेतले.किरकोळ वादाच्या कारणावरून दारुच्या नशेत सोपान केदार याने वडील विठ्ठल केदार यांच्या पोटात, चेहऱ्यावर, छातीवर तसेच डोक्यावर लाथबुक्क्यांनी मारले. तसेच स्लॅब वरून ढकलून दिल्याने विठ्ठल केदार यांचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथके मंगरुळ, चापडगाव, बोधेगाव भागात रवाना करण्यात आली होती. तसेच आरोपी सोपान विठ्ठल केदार याल पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटवून ताब्यात घेतले. नमुद गुन्हह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने अटक करण्यात आली.