अहमदनगर / नगर सह्याद्री :
Ahmednagar News : राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळ सालाबादप्रमाणे आयोजित केले जातात. परंतु यंदाच्या दिवाळी फराळांना मात्र राजकीय स्वरूप आले. जिल्ह्यात अनेक राजकीय मातब्बरांनी दिवाळी फराळ आयोजित केले होते.
या निमित्ताने प्रत्येकाचे राजकीय शक्तिप्रदर्शन झाले. आता उद्या (शुक्रवार) अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी विळद घाट येथे दिवाळी फराळ येथे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांसह नागरिक, कार्यकर्ते हजेरी लावतील.
जनसामान्यांशी नाळ
विखे घराण्याचे मागील तीन पिंढ्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील राजकरणावर मोठी पकड राहिली आहे. त्यांची जनसामान्यांशी नाळ जुळलेली आहे. तळागाळातील कार्यकर्ता जपावा तर विखेंनी असे म्हटले जाते. आता उद्याच्या दिवाळी फराळानिमित्ताने मतदार संघातील ओघानेच जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते एका ठिकाणी येतील.
राजकीय नेते मंडळींची एकत्र गुंफण
अहमदनगर मध्ये खासदार झाल्यानंतर विखे कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधक राजकीय नेतेही एकत्र सोबत घेतल्याचे दिसते. यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप असोत की काँग्रेसचे काही नेते मंडळी असोत. खा. सुजय विखे हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी विविध पक्षातील राजकीय नेते एकत्रित गुंफण्याचे काम केले असे म्हटले जाते. उद्या फराळानिमित्ताने हे सर्व एकत्र जर दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
विरोधकांची उडणार विकेट
जिल्ह्यात या आधी झालेल्या दिवाळी फराळांना विखे विरोधकांनी एकत्र हजेरी लावलेली दिसली. त्यामुळे आता खा.सुजय विखेंच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाकडे ‘अहमदनगरकरांचे’ लक्ष लागले आहे. कारण याठिकाणी आता कोण कोण एकत्र येतो, कोणते राजकीय गणिते जुळतात, व कोणत्या विरोधकांची विकेट पडते याकडे लक्ष लागले आहे.