अहमदनगर। नगर सहयाद्री:-
एका अनोळखी व्यक्तीचा मृतेदह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.अनोळखी व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या अज्ञात व्यक्तीचे वय ३५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.तसेच अंगावर टी शर्ट, जीन्स पॅन्ट व उजव्या हातावर गोदलेले आहे.
शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांनी पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेत पाहिला. त्यानंतर याची सर्व गावात चर्चा होऊन घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली.
अज्ञात व्यक्तीच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी धाव घेत नेवासा पोलिसांनी पाहणी केली.तसेच मृतदेह पुढील पंचनामा करण्यासाठी नेवासा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेद नकामी पाठविण्यात आला आहे.