अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगरहून छत्रपती संभाजी नगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरचे इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कामगाराला धडक दिली. यात त्या कामगाराचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दुचाकी, टेम्पो व हार्वेस्टर अशा चार बाहनांना धडक दिली.
या अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. शनिवारी (७ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रामदास बाळू पवार (वय ३५, रा. नाशिक) असे या अपघातात मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
एक मालवाहू कंटेनर नगरहून छत्रपती संभाजी नगरकडे भरधाव वेगात जात होता. पांढरीपूलच्या अलीकडे असलेल्या इमामपूर घाटात उताराला कंटेनरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकांचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले आणि तो कंटेनर समोर चाललेल्या वाहनांना पाठीमागून धडकल देत निघाल.
सुरूवातीला त्याने महामार्गावर खड्डे काम करणारे पवार यांना त्यानंतर पुढे बुजविण्याचे कामगार रामदास धडक दिली. चाललेल्या दोन दुचाकींना धडक दिली. पुढे एका टेम्पोला धडक दिली.
या धडकेने टेम्पो रस्त्यावर उलटला. पुढे जाऊन कंटेनरने एका हार्वेस्टरला धडक दिली. तो हार्वेस्टर रस्त्याच्या बाजूला उडून पडला. या अपघातात खड्डे बुजविण्याचे करणारे कामगार पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर धडक बसलेल्या चार वाहनांतील सहा जण जखमी झाले आहे.